Russia-Ukraine War : रशियातील जनता पुतिन यांच्या विरोधात रस्त्यावर, युद्धाला विरोध करणाऱ्या एक हजार लोकांना ताब्यात घेतले, Watch Video

 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिल्यानंतर रशियातील अनेक शहरांमध्ये या युद्धाविरोधात निदर्शने होत आहेत. लोक रस्त्यावर उतरून युद्ध नको असल्याच्या घोषणा देत आहेत. त्याचवेळी, आता रशियन पोलिसांनी या निदर्शनांवर कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुमारे एक हजार लोकांना ताब्यात घेतले आहे.Russia-Ukraine War People in Russia take to the streets to protest against Putin, one thousand people arrested for protesting against the war, Watch Video


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिल्यानंतर रशियातील अनेक शहरांमध्ये या युद्धाविरोधात निदर्शने होत आहेत. लोक रस्त्यावर उतरून युद्ध नको असल्याच्या घोषणा देत आहेत. त्याचवेळी, आता रशियन पोलिसांनी या निदर्शनांवर कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुमारे एक हजार लोकांना ताब्यात घेतले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य मॉस्कोमध्ये 2 हजार लोक जमले, तर पीटर्सबर्गमध्ये एक हजाराहून अधिक लोकांनी युद्धाचा निषेध केला. खरे तर पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिल्यानंतर अनेक रशियन कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. मॉस्कोमधील आंदोलकांनी “युद्ध नको”च्या घोषणा दिल्या. रशियामध्ये युक्रेन युद्धाच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले, त्यानंतर पोलिसांनी सुमारे एक हजार लोकांना ताब्यात घेतले आहे. जुनी राजधानी सेंट पीटर्सबर्ग येथे 1,000 हून अधिक लोक जमले होते, जिथे अनेकांना पोलिस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

एएएफपी वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन पोलीस युद्धाच्या विरोधात निषेध करणाऱ्या एका महिलेला व्हॅनच्या दिशेने ओढत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पोलिस अनेकांना पकडून व्हॅनमध्ये नेत असल्याचे व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे. रशिया-युक्रेन सीमेवर सुरू झालेल्या वादाने आता युद्धाचे रूप धारण केले आहे. दोन्ही देशांमधील तणाव लक्षणीयरित्या वाढला आहे. रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे. आता दोन्ही देशांमध्ये वेगवेगळे दावे केले जात आहेत. या सर्व दाव्यांच्या दरम्यान रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवमध्ये प्रवेश केल्याची बातमी येत आहे. असे सांगण्यात येतेय की रशियन सैन्य लवकरच युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेऊ शकते. याशिवाय कालपासून रशियाचे एक हेलिकॉप्टर युक्रेनच्या आकाशात घिरट्या घालत आहे. दोन्ही देशांदरम्यान निर्माण होत असलेल्या या परिस्थितीने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे.

Russia-Ukraine War People in Russia take to the streets to protest against Putin, one thousand people arrested for protesting against the war, Watch Video

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात