विशेष प्रतिनिधी
मॉस्को : रशियाने आता आपल्या स्पेस रॉकेटवरून अमेरिका, जपान आणि ब्रिटनचा ध्वज हटवला आहे. विशेष म्हणजे रशियाने भारतीय ध्वज तिरंगा कायम ठेवला आहे. रशियन स्पेस एजन्सी रोस्कोस्मोसचे प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी सोशल मीडियावर रशियन स्पेस रॉकेटचा व्हिडिओ शेअर केला आहे.Russia removes flags of many countries including US, Japan, Britain from space rocket, but Indian tricolor remains
व्हिडिओमध्ये दिसते की, रशियन स्पेस रॉकेटमधून अनेक देशांचे ध्वज हटवले जात आहेत, तर रॉकेटवर भारताचा ध्वज कायम असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘बैकोनूरमधील आमच्या टीमने ठरवले की आमचे रॉकेट काही देशांच्या ध्वजशिवाय चांगले दिसेल.’ कजाकिस्तानमधील बायकोनूर येथे रशियाने रॉकेट लॉन्च पॅड तयार केले आहे.
वनवेब इंटरनेट कंपनीला शुक्रवारी रशियन सोयुझ रॉकेटवर 36 सेटेलाइट लॉन्च करायचे होते, परंतु रोस्कोस्मोसने नकार दिला. यासाठी रोस्कोस्मोसने मंगळवारी एक निवेदन जारी केले की ते वनवेब कंपनीसाठी रशियन सोयुझ रॉकेट लॉन्च करणार नाही. दिमित्री रोगोजिन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ हा या सॅटेलाइट ला लॉन्च करणाºया रॉकेटचा व्हिडिओ आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App