विशेष प्रतिनिधी
मॉस्को – अवकाशात चित्रीकरण झालेला जगातील पहिला चित्रपट असा मान प्राप्त करण्यासाठी रशियाच्या एका अभिनेत्रीने आणि चित्रपट दिग्दर्शकाने अवकाशात उड्डाण केले. कझाखस्तानमधील रशियाच्या अवकाश केंद्रावरून सोयूझ एमएस-१९ या प्रक्षेपकाच्या मदतीने हे दोघे जण आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राकडे रवाना झाले आहेत.Rassia will made film in space
अवकाशयानात अभिनेत्री युलिया पेरेसिल्द आणि दिग्दर्शक क्लिम शिपेन्को यांच्याबरोबर एक अवकाशवीर आहे. ‘चॅलेंज’ या नावाच्या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात ते चित्रीकरण करणार आहेत.
युलिया ही एका डॉक्टरची भूमिका करत असून ह्रदयविकाराचा झटका आलेल्या एका अवकाशवीराला वाचविण्यासाठी ती अवकाशस्थानकात जाते, असा चित्रीकरणाचा विषय आहे. बारा दिवस हे चित्रीकरण चालणार असून त्यानंतर युलिया आणि क्लिम पृथ्वीवर परततील. या अवकाश उड्डाणासाठी दोघांनीही प्रशिक्षण घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App