रशियाचे राष्ट्रपती पुतीन म्हणाले, एके- ४७ इतकीच विश्वासार्ह आहे रशियन लस


एके-४७ रायफल ही सर्वात विश्वासार्ह मानली जाते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी स्पुतनिक लसची तुलना एके-47 रायफलशी केली आहे. ते म्हणाले, जगप्रसिद्ध कलाश्निकोव्ह रायफलप्रमाणेच रशियन लसही विश्वासार्ह आहे. Putin has said that the Russian vaccine is as reliable as the AK-47


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एके-४७ रायफल ही सर्वात विश्वासार्ह मानली जाते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी स्पुतनिक लसची तुलना एके-47 रायफलशी केली आहे. ते म्हणाले, जगप्रसिद्ध कलाश्निकोव्ह रायफलप्रमाणेच रशियन लसही विश्वासार्ह आहे.

उपपंतप्रधान तात्याना गोलिकोवा यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग दरम्यान बोलताना पुतीन म्हणाले, आमचे औषध तंत्रज्ञान कित्येक दशकांपासून वापरल्या जाणाºया पद्धतीवर आधारित आहे. ही लस नक्कीच आधुनिक आणि अद्ययावत आहे. लस विश्वसनीय आणि सुरक्षित आहे. हे फक्त आम्ही सांगत नाही तर युरोपियन स्पेशलिस्टसुद्धा हे सांगत आहेत.

पुतीन म्हणाले, लस उत्पादन वाढवले जात आहे. तज्ज्ञांच्या सूचनांच्या आधारेच याच्या वापराची शिफारस करू शकतात. निकालांच्या विश्लेषणाच्या आधारे सुमारे दहा वषार्नंतर ही समस्या सोडवली जाईल. लाइट स्पुतनिक लससुद्धा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे.



जगभरातील प्लॅटफॉर्मने अमेरिकन कंपनी फायझरच्या मॉर्डना लसीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे सांगून पुतीन म्हणाले, जगभरातील औषध उत्पादकांमधील जागतिक बाजारात स्पर्धा उशीरा झाली. आपल्याला समजून घ्यावे लागेल की,जगातील बाजारामध्ये ही अतिशय वेगवान प्रतिस्पर्धा करत आहे. तज्ञ, परदेशी सहयोगकर्ते आणि अमेरिकेच्या अहवालांनी त्याचे आधुनिक आणि नाविन्यपूर्ण औषध म्हणून वर्णन केले आहे. मला आशा आहे की तज्ञ कोणतीही चूक करीत नाहीत.

Putin has said that the Russian vaccine is as reliable as the AK-47

महत्वाच्या  बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात