विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : देसी गर्ल प्रियांका चोप्राने क्वांटिको या सीरिज मधून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने बऱ्याच हॉलीवूड सिनेमांमध्ये काम केले. हॉलीवूड मध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून तिने आपले एक वेगळे स्थान बनवण्यात यश मिळवले आहेच. तिच्या अचिवमेंट्स मध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे.
Priyanka Chopra’s ‘Unfinished’ book gets Grammy Awards 2020 nomination
प्रियांकाने नुकताच तिचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. ‘अनफिनिश्ड’ असे या पुस्तकाचे नाव आहे. आपल्या आयुष्यातील बऱ्याच आठवणी तिने या पुस्तकामध्ये शेयर केले गेल्या आहेत. या पुस्तकाचे ऑडिओ बुक देखील प्रकाशित करण्यात आले आहे. तर आता न्यूज अशी आहे की, प्रियांकाच्या या बुकला ग्रॅमी अवॉर्ड्स 2020 मध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. हे नॉमिनेशन्स स्पोकन वर्ड कॅटेगिरी मधून मिळाले आहे.
प्रियंकाच्या ‘अनफिनिश्ड’ चा किस्सा : बॉलिवुडचा ‘ तो ‘ कटू अनुभव …अन् त्यावेळी सलमान आला धावून
प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्याचप्रमाणे या पुस्तकाला वोट करण्यासाठी तिने एक लिंकदेखील शेअर केली आहे.
प्रियांका चोप्राने प्रोड्यूस केला द् व्हाईट टायगर हा सिनेमा प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला होता. त्यानंतर प्रियांका आता मॅट्रिक्स रिसरेक्शनस या सिनेमांमध्ये दिसून येणार आहे. त्याच प्रमाणे प्रियांका, कतरीना आणि आलीया ची प्रमुख भूमिका असणारा ‘जी ले जरा’ हा झोया अखतर दिगदर्शीत सिनेमा देखील लवकरच रिलीज होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App