चीनच्या कच्छपि लागलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चीनचा वाण नाही पण गूण लागला आहे. पाकिस्तानमधील माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणण्यात आली आहेत.Pressure on media continues in Pakistan, ban on journalists
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : चीनच्या कच्छपि लागलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चीनचा वाण नाही पण गूण लागला आहे. चीनप्रमाणेच पाकिस्तानमधील माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणण्यात आली आहेत.
प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणाºया नव्या नियमांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यात माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अटी-शर्ती लावण्यात आल्या आहेत. त्यासाठी सरकार पाकिस्तान मीडिया डेव्हलपमेंट अॅथॉरिटीसंबंधी अधिसूचना २०२१ आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
त्यात लष्कर तसेच सरकारवर टीका केल्यास अशा मीडिया संस्थेला टाळे लावण्याची तरतूदही नव्या नियमांत करण्यात आली आहे. या नियमामुळे आता देशभरात नव्या कायद्याच्या मसुद्यालाच विरोध सुरू झाला आहे. हा कायदा लागू झाल्यास कोणतेही माध्यम सरकारच्या विरोधात बोलणार नाही.
पाकिस्तान सरकारने प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक यंत्रणा उभी करण्याचे ठरवले आहे. – एका समितीच्या माध्यमातून नियमावली लागू होईल. त्यात ११ सदस्य व अध्यक्ष असेल. सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीद्वारे नियुक्ती होईल.
नव्या कायद्याअंतर्गत मुद्रित, इलेक्ट्रॉनिकपासून डिजिटल मीडियापर्यंतची नियमावली. देशातील वृत्तपत्रे, डिजिटल माध्यम चालवण्यासाठी टीव्ही चॅनलनुसार परवाना घेणे बंधनकारक असेल. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, यूट्यूब चॅनल, व्हिडिओ लॉग्ज इत्यादीवरून नियमावली असेल.
चीनमध्येही याच पध्दतीने प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू आहे. गलवान खोऱ्यामध्ये भारतीय-चिनी सैनिकांतील धुमश्चक्रीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्लॉगरला तुरुंगात डांबण्यात आले.
चाऊ जिमिंग असे ब्लॉगरचे नाव आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चीनचे ४० सैनिक ठार झाल्याचा दावा ब्लॉगमधून करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App