ते डोक्यात गोळी घालतात, पण क्रांती ह्रदयातून होते….असे काव्य रचणारा कवी म्यानमारमध्ये हुतात्मा


विशेष प्रतिनिधी

यंगून : म्यानमारमधील लोकप्रिय तरूण कवी खेट थी यांचा अटकेदरम्यान मृत्यू झाला आहे. सत्ता ताब्यात घेतलेल्या लष्कराच्या कायदेमंडळावरील टीकेमुळे त्यांचा गळा घोटण्यात आल्याची दाट शक्यता आहे.Popular poet died in Myanmar

खेट ४५ वर्षांचे होते. त्यांनी लष्करी उठावाला विरोध केला होता. ते डोक्यात गोळी घालतात, पण क्रांती ह्रदयातून होते हे त्यांना माहीत नाही, अशा त्यांच्या ओळी आंदोलकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.सागैंग प्रांतातील श्वेबो गावात शनिवारी खेट यांना पत्नी चॉ सू यांच्यासह चौकशीसाठी सशस्त्र जवान आणि पोलिसांनी ताब्यात घेतले. चॉ सू यांनी बीबीसी बर्मीज वृत्तसंस्थेला मोनीवा येथून सांगितले की, माझी चौकशी झाली.

खेट यांचीही चौकशी झाली. त्यांना चौकशी ठाण्यावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण ते परत आले नाहीत, त्यांचे पार्थिवच आले. लष्कराने खेट यांच्या पार्थिवाचे दफन करण्याची तयारी केली होती. त्यामुळे चॉ सू यांना मनधरणी करावी लागली.

Popular poet died in Myanmar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण