अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओंकडून सुषमा स्वराज यांचा अपमान; जयशंकर यांनी फटकारले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी आपल्या एका पुस्तकात भारताच्या दोन परराष्ट्र मंत्र्यांची तुलना केली आहे. सुषमा स्वराज आणि सुब्रमण्यम जयशंकर ही त्यांची नावे असून त्यात माइक पॉम्पेओ यांनी सुषमा स्वराज यांचा उल्लेख अतिशय अनुचित अपमानास्पद भाषेत केला आहे. या भाषेचा विद्यमान परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून पॉम्पेओ यांच्या पुस्तकातल्या मजकुराशी आपण अजिबात सहमत होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. Pompeo says Sushma Swaraj was not important; Jaishankar hits back

माइक पॉम्पेओ हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री होते. त्यांनी “नेव्हर गिव्ह अँड इंच फाईट फॉर अमेरिका आय लव” या नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर अपमानास्पद शब्दात टिपण्णी केली आहे.



सुषमा स्वराज यांना मी कधीच बरोबरीचे समजलो नाही. कारण त्या goofball होत्या. म्हणजेच विदूषक होत्या. परराष्ट्र धोरणातले त्यांना फारसे काही कळत नव्हते. त्यापेक्षा सुब्रमण्यम जयशंकर हे माझ्या कितीतरी बरोबरीचे आणि अनेकदा सरस होते. ते इंग्रजी बरोबरच अन्य सात भाषाही बोलू शकत होते. मी जास्तीत जास्त सुब्रमण्यम जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याच बरोबर काम केले, अशा शब्दात माइक पॉम्पेओ यांनी वर्णन केले आहे.

माइक पॉम्पेओ यांनी सुषमा स्वराज यांच्या विषयी goofball हा शब्द वापरल्याने परराष्ट्रमंत्री जयशंकर संतप्त झाले आहेत. सुषमा स्वराज यांच्याबरोबर मी काम केले आहे. त्यांच्या कार्यक्षमतेविषयी आणि खुद्द त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी मला खूप आदर वाटतो. पॉम्पेओ यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत होऊ शकत नाही, अशा शब्दात जयशंकर यांनी फटकारले आहे.

याच पुस्तकात माइक पॉम्पेओ यांनी पुलवामाच्या घटनेनंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करणार होता, असा खळबळजनक खुलासा केला आहे. त्या मुद्द्यावरून देखील दोन्ही देशांमध्ये राजकीय आणि राजनैतिक वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. मात्र सुषमा स्वराज यांच्या विषयी अपमानास्पद लिखाण करून पॉम्पेओ यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा रोष देखील ओढवून घेतला आहे.

Pompeo says Sushma Swaraj was not important; Jaishankar hits back

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात