इम्रान खान यांच्या घराचे गेट तोडून पोलीस आत शिरले; लाठीमार करत समर्थकांना पिटाळले!

PAKISTAN IMRAN KHAN

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घराचे गेट पोलिसांनी बुलडोझरने तोडले आणि त्यांच्या घरात घुसले. यानंतर इम्रान खान यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली, पोलिसांनी बळाचा वापर करत समर्थकांवर लाठीमार केला व त्या घराच्या आवारातून पिटाळून लावले. Police broke the gate of Imran Khan house  and entered

तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीच्या संदर्भात इम्रान खान आज इस्लामाबादला जात असताना त्यांच्या वाहन ताफ्यामधील तीन वाहनांना अपघात झाला, यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. तर इम्रान खान सुखरूप आहेत.

जबरदस्त कामगिरी! अवघ्या सहा महिन्यांत भारतात ४३३ जिल्ह्यांमध्ये १ लाखांहून अधिक 5G टेलिकॉम साइट्स स्थापित

यानंतर इम्रान खान म्हणाले की, आता हे स्पष्ट झाले आहे की माझ्या सर्व प्रकरणांमध्ये जामीन मिळूनही पीडीएम सरकार मला अटक करू इच्छित आहे. त्यांचा दुर्भावनापूर्ण हेतू माहीत असूनही मी इस्लामाबाद आणि न्यायालयात जात आहे, कारण माझा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे.

याशिवाय, “पंजाब पोलिसांनी जमान पार्कमधील माझ्या घरावर हल्ला केला आहे. जेथे बुशरा बेगम एकट्या आहेत. ते कोणत्या कायद्यानुसार हे करत आहेत? हा लंडन प्लॅनचा एक भाग आहे. असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट केले.

Police broke the gate of Imran Khan house  and entered

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”