Sri lanka : भारताची श्रीलंकेला अवघ्या 3 महिन्यांत 2.5 अब्ज डॉलरपेक्षा अधिक मदत, तरीही लंका आर्थिक गर्तेतच!!


वृत्तसंस्था

कोलंबो : प्रचंड महागाई आणि प्रचंड टंचाईने होरपळलेल्या जनतेने अखेर श्रीलंकेचे राष्ट्रपती भवन “जनाधिपती मंदिरय्या” वर हल्लाबोल केला आणि ते अक्षरशः आपल्या ताब्यात घेतले. सध्या श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात जनतेचा ताबा असून राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांनी पोबारा केला आहे. श्रीलंकन नौदलाच्या नौकेवर गोटाबाय राजपक्षे यांचे सामानसुमान ठेवले जात असल्याचे फोटो सोशल मीडियात फिरत आहेत. People gather in large numbers outside the Presidential Secretariat in Colombo

श्रीलंकेत पूर्ण यादव आणि अराजक माजले आहेत. जपान सहभागी अन्य देशांनी श्रीलंकेला आर्थिक मदत देणे हे नाकारले आहे. कारण अशी मदत नेमकी कोणाला द्यायची? आणि त्यामध्ये तिचा सर्वसामान्य जनतेला लाभ कितपत होईल? याविषयी सर्व देशांना शंका आहे. कारण श्रीलंकेत आता राजकीय व्यवस्थाच उरलेली दिसत नाही संपूर्ण देश संतप्त जनतेच्या उद्रेकाने अक्षरशः ज्वालामुखी बनला आहे.

गेल्या 3 महिन्यांत भारताने श्रीलंकेला 2.5 अब्ज डॉलरची मदत केली आहे. पण यामध्ये तिचाही श्रीलंकेचे सरकार उपयोग करू शकलेले दिसत नाही.

सुमारे 35 अब्ज डॉलर्सच्या चीनच्या कर्जाखाली संपूर्ण दबून गेलेली श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी असताना आणि तेथे सर्वसामान्य जनतेची अन्नान्नदशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर “नेबर फर्स्ट” या धोरणानुसार भारताने श्रीलंकेला भरघोस मदत केली. जानेवारी 2022 पासून मार्च 2022 अखेरपर्यंत अवघ्या 3 महिन्यांमध्ये भारताने श्रीलंकेला केलेली मदत 2.5 अब्ज डॉलरच्या पुढे पोहोचली. पण श्रीलंकन सरकार देशाला सावरू शकले नाही.

श्रीलंका चीनच्या कर्जाच्या बोजाखाली एवढी दबली आहे की देश आर्थिक दिवाळखोरीत पोहोचला आहे. जनतेच्या जगण्याच्या सर्वसामान्य वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेतच पण अनेक ठिकाणी प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. श्रीलंकेत अन्नासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. आर्थिक परिस्थिती हाताळणे तिथल्या सरकारच्या क्षमते बाहेर पोहोचले आहे. म्हणूनच आज संतप्त जनतेने श्रीलंकेचे राष्ट्रपती गोठा बाय राजपक्ष यांचे अधिकृत निवासस्थान जनाधिपती मंदिरय्या हे ताब्यात घेऊन टाकले आहे.

– पंतप्रधानांचे जनतेने घर जाळले होते

श्रीलंकेची स्थिती अराजक, यादवी या शब्दांच्याही पलिकडे गेली आहे. दिवाळखोरीने श्रीलंकेत हिंसाचार टोक गाठले आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतरही जमावाचा संताप कमी होताना दिसला नाही. हिंसक जमावाने महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली होती. आंदोलकांनी हंबनटोटा येथील राजपक्षे कुटुंबाचे वडिलोपार्जित घर ‘मेदमुलाना वालवा’ जाळले. आगीत हे घर पूर्णपणे जळून खाक झाले होते.

– हिंसाचाराला अटकाव नाही

या घटनेनंतर श्रीलंकेतील परिस्थिती सतत बिघडत गेली. त्या वेळच्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 200 जण जखमी झाले. मृतांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचाही समावेश होता. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर देशातील परिस्थिती अधिकच बिघडली. हजारो सरकार समर्थकांनी आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार सुरू केला.

– चिनी कर्जाच्या गर्तेत

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच चीनच्या कर्जाच्या गर्तेत सापडून आर्थिक आणीबाणीच्या संकटात सापडलेल्या श्रीलंकेत गेल्या 2 महिन्यांपासून अस्वस्थता आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महिंदा यांनी सोमवारी राजीनामा दिला. ट्विटरवर त्यांनी ही माहिती जनतेला दिली. त्यानंतर राजपक्षे समर्थकांनी विरोधकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. तर राजधानी कोलंबोत अनेक ठिकाणी जाळपोळ केली.

आणि आज श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान जनाधिपती मंदिरय्या देखील संतप्त जनजीतेच्या ताब्यात गेले आहे.

People gather in large numbers outside the Presidential Secretariat in Colombo

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात