विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – तालिबानला बळ देण्यात आणि त्यांना अफगाणिस्तानचा ताबा मिळवून देण्यात पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या गुप्तचर संस्थांनी मोठी भूमिका बजावली असल्याचा आरोप अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे खासदार स्टीव्ह शबोट यांनी केला आहे. अफगाणिस्तानला अंधारात ढकलणाऱ्या तालिबान्यांनाच्या विजयाचा पाकिस्तानमध्ये जल्लोष केला गेल्याबद्दल शबोट यांनी संताप व्यक्त केला.Pakistan is backing Taliban govt.
येथील ‘हिंदू राजकीय कृती समिती’च्या एका परिषदेत बोलताना स्टीव्ह शबोट यांनी भारताची स्तुती केली. ते म्हणाले, अमेरिकेतील हिंदू समाजाने देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच अमेरिकेत हिंदू समाजावर हल्ले होणे ही चिंतेची बाब समजली जाते. अमेरिकेत वंशद्वेषाला कोणतेही स्थान नाही.
‘‘तालिबानकडून मारले जाण्याची भीती असलेल्या अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांना आश्रय देण्याचे भारताचे धोरण कौतुकास्पद आहे. याउलट पाकिस्तानने मात्र तालिबानी दहशतवाद्यांना खतपाणी घातले आणि अफगाणिस्तानमध्ये त्यांची सत्ता आणण्यात हातभार लावला.
एखाद्या दहशतवादी संघटनेच्या विजयाचा पाकिस्तानचे अधिकारी जल्लोष करतानाचे दृश्यय चीड आणणारे आहे,’’ असे शबोट म्हणाले. पाकिस्तानमध्येही अल्पसंख्याकांवर प्रचंड अत्याचार होतात, अमेरिका सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करते, असा टोमणाही त्यांनी आपल्या सरकारला मारला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App