विशेष प्रतिनिधी
बिजींग : चीनमध्ये कोरोनाचा नव्याने विस्फोट होण्यामागे पाकिस्तान असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमधून आलेलं एक विमान चीनमधील कोरोनाच्या या प्रसारासाठी जबाबदार आहे. शियान शहरात हे विमान आल्यावर अधिकाऱ्यांनी पुरेशी काळजी घेतली नाही.Pakistan gives corona gift to China! A plane came and the whole city went into lockdown
त्यामुळे याठिकाणी कोरोनाचा विस्फोट होऊन लॉकडाऊन लावावा लागला. चीनच्या केंद्रीय अनुशासन निरीक्षण आयोगाने जारी केलेल्या एका वक्तव्यानुसार शियानमधील 26 अधिकाऱ्यांना याप्रकरणी दोषी ठरविले आहे.
चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने शियान शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
चीनमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमागे पाकिस्तान कारणीभूत असल्याची माहिती आता समोर आली आहे. चीनमधील शियान शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली आहे.
चीनने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तसं केलं नाही. आता अशाच काही बेजबाबदार लोकांमुळे एक कोटीहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शियान शहरामध्ये लॉकडाऊन करावा लागला आहे.
चीनसमोर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान आहे. फेब्रुवारी महिन्यात विंटर ऑलिपिक खेळांसाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून खेळाडू चीनमध्ये दाखल होणार आहेत. चीन सध्या डेल्टा आणि ओमायक्रॉनचा प्रादुभार्वावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण तयारी करत असल्याचं चित्र दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App