Pakistan Bus Blast : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बसचा स्फोट, नऊ चिनी मजुरांसह 13 जण ठार

Pakistan Bus Blast Killed 9 chinese Workers investigation underway

Pakistan Bus Blast : उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये बसच्या स्फोटात नऊ चिनी कामगारांसह 13 जण ठार झाले. ही बस चिनी अभियंता, सर्व्हेअर आणि यांत्रिकी कामगारांना खैबर पख्तूनख्वामधील निर्माणाधीन धरणावर नेत होती. मात्र, हा स्फोट रस्त्याच्या कडेला असलेल्या उपकरणामुळे झाला की बसमधीलच एखाद्या वस्तूमुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खैबर- पख्तूनख्वाचे उच्च पोलीस अधिकारी मोअज्जम जाह अन्सारी यांनी चिनी नागरिक, दोन सैनिक आणि दोन स्थानिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. Pakistan Bus Blast Killed 9 chinese Workers investigation underway


वृत्तसंस्था

पेशावर : उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये बसच्या स्फोटात नऊ चिनी कामगारांसह 13 जण ठार झाले. ही बस चिनी अभियंता, सर्व्हेअर आणि यांत्रिकी कामगारांना खैबर पख्तूनख्वामधील निर्माणाधीन धरणावर नेत होती. मात्र, हा स्फोट रस्त्याच्या कडेला असलेल्या उपकरणामुळे झाला की बसमधीलच एखाद्या वस्तूमुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खैबर- पख्तूनख्वाचे उच्च पोलीस अधिकारी मोअज्जम जाह अन्सारी यांनी चिनी नागरिक, दोन सैनिक आणि दोन स्थानिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “स्फोटानंतर बस एका खोल दरीत कोसळली आणि तिचे मोठे नुकसान झाले. एक चिनी अभियंता आणि एक सैनिक बेपत्ता आहेत. हवाई रुग्णवाहिकांनी जखमींना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू केले असून संपूर्ण सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

पोलीस तपास करत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. हेलिकॉप्टरने घटनास्थळी जाणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, हे तोडफोड केल्यासारखे दिसत आहे. इतर तीन अधिकाऱ्यांनीही बसमध्ये स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हजारा भागातील एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, बस अप्पर कोहकिस्तानमधील दासू धरणाच्या जागी 30 हून अधिक चिनी अभियंत्यांना घेऊन जात होती. दासू जलविद्युत प्रकल्प हा चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरचा (सीपीईसी) भाग आहे. बीजिंगच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत ही 65 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक योजना आहे. या योजनेचा उद्देश दक्षिण चीनमधील ग्वादर समुद्री बंदराशी पश्चिम चीनला जोडणे हा आहे.

पाकिस्तानमधील चिनी दूतावासानेही या दुर्घटनेबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, “पाकिस्तानमधील चिनी कंपनीच्या प्रकल्पावर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये चिनी नागरिक ठार झाले.” दूतावासाने चिनी कंपन्यांना त्यांची सुरक्षा प्रक्रिया अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.

Pakistan Bus Blast Killed 9 chinese Workers investigation underway

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात