पाकिस्तानात सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी पुन्हा एकदा ट्विट करून परकीय षड्यंत्राचा जप सुरू केला आहे. पाकिस्तानचे सरकार पाडण्यामागे परकीय षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला असून त्यासाठी विरोधकांना पैसेही देण्यात आल्याचा आरोप केला. यासाठी इम्रान खान यांनी थेट अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत.Pakistan became an independent country in 1947, but today the war of independence has started again, Imran’s first tweet after the fall of the government
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानात सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी पुन्हा एकदा ट्विट करून परकीय षड्यंत्राचा जप सुरू केला आहे. पाकिस्तानचे सरकार पाडण्यामागे परकीय षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला असून त्यासाठी विरोधकांना पैसेही देण्यात आल्याचा आरोप केला. यासाठी इम्रान खान यांनी थेट अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. वास्तविक, ही बाब अमेरिकेने तर फेटाळलीच, पण खुद्द पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्याकडे लक्ष दिले नाही.
Pakistan became an independent state in 1947; but the freedom struggle begins again today against a foreign conspiracy of regime change. It is always the people of the country who defend their sovereignty & democracy. — Imran Khan (@ImranKhanPTI) April 10, 2022
Pakistan became an independent state in 1947; but the freedom struggle begins again today against a foreign conspiracy of regime change. It is always the people of the country who defend their sovereignty & democracy.
— Imran Khan (@ImranKhanPTI) April 10, 2022
इम्रान खान यांनी ट्विट केले की, ‘पाकिस्तान 1947 मध्ये स्वतंत्र देश झाला, पण आज पुन्हा एकदा सत्ता बदलण्याच्या विदेशी षडयंत्राविरोधात स्वातंत्र्य लढा सुरू झाला आहे. ते नेहमीच देशाचे लोक असतात, जे त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि लोकशाहीचे रक्षण करतात.” त्यांनी इंग्रजी आणि उर्दू भाषेत त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्विट केले आहे. यावरून इम्रान अजूनही परकीय कारस्थानाच्या दाव्यावर ठाम असल्याचे दिसून येते. याशिवाय, इम्रान अजूनही त्याच्या ट्विटर बायोमध्ये स्वत:ला पाकिस्तानचा पंतप्रधान असल्याचे दर्शवले आहे.
इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव
इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा विक्रमी पातळीवर वाढला असून देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे येथे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कारणास्तव इम्रान खान यांच्यावर आर्थिक गैरव्यवस्थापनाचा विरोधकांकडून आरोप करण्यात आला आणि मार्चच्या सुरुवातीलाच त्यांना सत्तेवरून हटवण्यासाठी नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. मात्र, इम्रान खान यांनी हे टाळण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलली. एवढे करूनही अखेर त्यांना पायउतार व्हावेच लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App