विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – ‘पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वांत मोठा पाठिराखा आणि सूत्रधार देश असूनही तो स्वत:ला पीडित देश म्हणवून घेतो. या देशाने सर्व अल्पसंख्याकांच्या हत्या थांबवाव्यात,’ अशी कठोर शब्दांत भारताने पाकिस्तानला फटकारले आहे.Pakistan backs terrorism says India
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधी डॉ. काजल भट म्हणाल्या की,‘‘संयुक्त राष्ट्राच्या प्रत्येक सदस्याने आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि आपापल्या जबाबदारीचे पालन करणे आवश्याक आहे. पाकिस्तानने मात्र खोटे आरोप करण्यासाठी वारंवार या व्यासपीठाचा वापर केला आहे.
हाच देश दहशतवाद पोसणारा आणि दहशतवादी कारवायांचा सूत्रधार आहे. त्यामुळे त्यांचे सर्व आरोप आम्ही पुन्हा एकदा फेटाळून लावत आहोत.’’ दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान दोषीच असल्याचेही भारताने स्पष्टपणे सांगितले.
पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीिरचा मुद्दा उपस्थित करत भारतावर आरोप केले होते. पाकिस्तानने त्यांच्या देशातील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या होणाऱ्या हत्या रोखाव्यात, असे आवाहनही भारताने केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App