Over 260 Afghan Sikhs in Kabul Gurdwara : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील कार्ते परवान गुरुद्वारामध्ये शीख समुदायाच्या 260 हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. देशातून बाहेर पडण्यासाठी या लोकांना मदत हवी आहे. एका अमेरिकन शीख संघटनेने रविवारी ही माहिती दिली. युनायटेड शीख या अमेरिकेतील शीख संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, “काबुलमधील कार्ते परवान गुरुद्वारामध्ये 260 हून अधिक अफगाणी नागरिक थांबले आहेत. ज्यात महिला आणि 50 पेक्षा जास्त मुले आहेत, यात तीन नवजात मुलांचाही समावेश आहे, त्यापैकी एकाचा जन्म कालच झाला होता. Over 260 Afghan Sikhs in Kabul Gurdwara need help in evacuation says US Sikh body
विशेष प्रतिनिधी
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील कार्ते परवान गुरुद्वारामध्ये शीख समुदायाच्या 260 हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. देशातून बाहेर पडण्यासाठी या लोकांना मदत हवी आहे. एका अमेरिकन शीख संघटनेने रविवारी ही माहिती दिली. युनायटेड शीख या अमेरिकेतील शीख संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, “काबुलमधील कार्ते परवान गुरुद्वारामध्ये 260 हून अधिक अफगाणी नागरिक थांबले आहेत. ज्यात महिला आणि 50 पेक्षा जास्त मुले आहेत, यात तीन नवजात मुलांचाही समावेश आहे, त्यापैकी एकाचा जन्म कालच झाला होता.
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानच्या शीख समुदायाच्या लोकांना तेथून बाहेर पडण्यासाठी फक्त भारताने मदत केली आहे. ‘युनायटेड शीख’ म्हणाले, ‘आम्ही या संदर्भात अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ताजिकिस्तान, इराण आणि ब्रिटनसह अनेक देशांच्या सरकारांशी बोलत आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय मदत संस्था आणि स्वयंसेवी संस्थांशीदेखील बोलत आहोत, जे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. याव्यतिरिक्त आम्ही अफगाणिस्तानमधील तळागाळात या संदर्भात काम करणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात आहोत.
‘युनायटेड शीख’ च्या मते, या बचाव कार्याचे सर्वात मोठे आव्हान कार्ते परवन गुरुद्वारा ते काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत 10 किलोमीटरचे अंतर आहे. या मार्गात अनेक चेकपोस्ट उभारण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक समाजातील काही लोकांनी गेल्या आठवड्यात बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, जो अयशस्वी ठरला. गुरुद्वारामध्ये आश्रय घेतलेल्या जलालाबादचे सुरबीर सिंह म्हणाले, “आम्ही विमानतळावर जाण्यास तयार आहोत, परंतु काबूलहून उड्डाणे रद्द होण्याची भीती आहे. महिला, मुले, वृद्ध आणि अर्भकांना देशाबाहेर नेण्याची ही एकमेव संधी आहे. एकदा जर या लोकांनी संपूर्ण देश ताब्यात घेतला, तर आमच्या समुदायाचा अंत होईल.
Over 260 Afghan Sikhs in Kabul Gurdwara need help in evacuation says US Sikh body
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App