विशेष प्रतिनिधी
काबूल – तालिबानच्या शिक्षण मंत्रालयाने सहावी ते बारावीच्या सर्व मुलग्यांनी उद्यापासून शाळेत हजर रहावे, असे आदेश दिले आहेत. सर्व पुरुष शिक्षकांनाही कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.Only boys can go to school in Afghanistan
शिक्षण मंत्रालयाने फेसबुकवरून हा आदेश जारी केला आहे. आदेशात मुलींना आणि महिला शिक्षकांना शाळेत येण्याबाबत कोणतीही सूचना केलेली नाही. तालिबानने पहिली ते सहावीपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना शाळेत येण्याची परवानगी दिली आहे.
अफगाणिस्तानमध्ये अद्यापही काही प्रांतांमध्ये नोकरदार अथवा व्यावसायिक महिलांना कामावर जाण्यास मनाई आहे.अफगणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यापासून रोज नवनवे फतवे काढले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिलांविरोधी फतव्यांचा जास्त समावेश आहे.
गेल्या बारा वर्षात येथे मुलींच्या शिक्षणाची कवाडे खुली झाली होती. मात्र तालिबानचा मुलींच्या शिक्षणास कडवा विरोध आहे. मात्र जगभरातून हणारी टीकेची झोड थांबवण्यासाठी त्यांनी मुलींच्या शिक्षणाला परवानगी देण्याचे धोऱणे जाहीर केले होते.
अर्थात आता त्यात तालिबान्यांनी पुन्हा वगळा खोडा घातला आहे. आता लहान मुलींच्या शिक्षणाला त्यांनी परवानगी दिली असून मोठ्या मुलींच्या शिक्षणाला मात्र विरोध केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App