विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – ओमिक्रॉन संसर्ग वाढीमुळे अमेरिकेची स्थिती बिघडत चालली आहे. रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनाची लाट आल्यानंतर प्रथमच अमेरिकेत एका आठवड्यात २० लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत २४.९ लाख रुग्णांची नोंद झाली आहे.Omricon increasing in USA
यापूर्वी जानेवारी २०२१ मध्ये ३ ते ९ तारखेदरम्यान सर्वाधिक १.७ लाख रुग्णांची नोंद झाली होती. ओमिक्रॉन येण्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये केवळ २५ लाख रुग्णांची संख्या नोंदली गेली होती. आता मात्र दररोज सरासरी साडेतीन लाख रुग्णांना बाधा होत आहे.
कोरोना आणि आता ओमिक्रॉनमुळे संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत निर्बंधात झाले. यादरम्यान व्हॅटिकन सिटी येथे नवीन वर्षानिमित्त होणारा जल्लोष पोप फ्रान्सिस यांनी रद्द केला आहे.
सेंट पीर्ट्स स्क्वेअर येथे होणारा स्वागत सोहळा पोप यांनी रद्द केला आहे. नागरिकांची होणारी गर्दी पाहता पोप यांनी निर्णय घेतला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोप सेंट पीटर्स स्क्वेअरच्या नेटेविटी सीनवर जातात. परंतु यंदा गेले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App