नॉर्दन अलायन्सने युद्धात पहिला मोहरा गमावला; पंजशीरमध्ये तालिबानबरोबर लढताना फहीम दश्ती यांचा मृत्यू


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानमध्ये नॉर्दन रेझिस्टन्स फोर्स (अहमद मसूदचा गट) आणि तालिबान यांच्यात पंजशीर येथे घमासान युद्ध सुरु आहे. त्यात नॉर्दन आघाडीचे प्रवक्ते फहीम दश्ती हे युद्धात मारले गेले आहेत. NRF Speaker fahim Dashty death in the war against Taliban in panjshir

फहीम दश्ती जवळपास ३० वर्षे एनआरएफसोबत काम करत होते. २००१ मध्ये, जेव्हा अल कायदा आणि तालिबाननं मिळून नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूद यांची हत्या केली, तेव्हा फहीम दश्ती या हल्ल्यातून बचावले होते. आता बरोबर २० वर्षांनंतर, फहीम दश्ती तालिबानशी झालेले युद्धात मारले गेले आहेत.



पंजशीरचा सर्वात निष्ठावंत नेता

फहीम दश्ती जेव्हा लहान होते, तेव्हा ते लग्न समारंभात नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूदला भेटले होते. १९८०च्या दशकात अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वाखालील मुजाहिदीनचा सोव्हिएत युनियनशी संघर्ष झाला होता. याच घटनेपासून प्रेरित होऊन, दश्ती यांनी १९९० मध्ये नॉर्दन आघाडीत प्रवेश केला होता.

९ सप्टेंबर २००१ रोजी अल कायदाचे काही दहशतवादी पत्रकार बनून अहमद शाह मसूद यांच्या भेटीला आले होते. त्यांनी मसूद यांची रुममध्ये मोठा स्फोट घडवून आणला होता. यात फहीम गंभीररित्या भाजले होते. पण त्यांचा प्राण वाचला होता. अमेरिकेच्या ९/११ हल्ल्याच्या दोन दिवस आधी अहमद शाह मसूदची हत्या झाली होती. फहीम दश्ती हे एक तरुण पत्रकार होते. त्यामुळे त्यांना नॉर्दन आघाडीच्या घडामोडीबाबत रिपोर्टींगचे काम देण्यात आले होते.

NRF Speaker fahim Dashty death in the war against Taliban in panjshir

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात