US Airstrike On ISIS-K : संतापलेल्या अमेरिकेने घेतला काबूल स्फोटाचा बदला, ISIS-K च्या तळांवर एअर स्ट्राइक, स्फोटाच्या सूत्रधाराचा खात्मा

Now us airstrike ON ISIS-K, targets Mastermind Of Kabul airport blast afghanistan

US Airstrike On ISIS-K : अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेने इस्लामिक स्टेट ग्रुप (इसिस-के) विरोधात 48 तासांच्या आत ड्रोन हल्ला केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालय पेंटागॉनने दावा केला आहे की, काबूल हल्ल्याच्या मास्टरमाइंडवर ही कारवाई करण्यात आली आहे. हा संपूर्ण तळ नष्ट करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी काबूल विमानतळाजवळ झालेल्या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह किमान 169 जण मारले गेले. Now us airstrike ON ISIS-K, targets Mastermind Of Kabul airport blast afghanistan


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेने इस्लामिक स्टेट ग्रुप (इसिस-के) विरोधात 48 तासांच्या आत ड्रोन हल्ला केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालय पेंटागॉनने दावा केला आहे की, काबूल हल्ल्याच्या मास्टरमाइंडवर ही कारवाई करण्यात आली आहे. हा संपूर्ण तळ नष्ट करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी काबूल विमानतळाजवळ झालेल्या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह किमान 169 जण मारले गेले.

एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेने नागरिकांना काबूल विमानतळाचे गेट लवकरात लवकर रिकामे करण्यास सांगितले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानच्या नंगरहारमध्ये हा हवाई हल्ला केला आहे.

यूएस सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन म्हणाले, “अमेरिकन लष्कराने आज इस्लामिक स्टेट-खोरासान (ISK) या दहशतवादी संघटनेविरोधी ऑपरेशन सुरू केले. हा मानवरहित हवाई हल्ला अफगाणिस्तानच्या नांगहर प्रांतात झाला. आम्ही टारगेट व्यक्तीला ठार केल्याचे सुरुवातीचे संकेत आहेत. आमच्याकडे नागरिकांच्या हानीबद्दल कोणतीही माहिती नाही.”

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले होते- बदला घेऊ!

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या हल्ल्यासाठी इस्लामिक अतिरेक्यांना दोषी ठरवले आणि या घटनेचा बदला घेण्याचे म्हटले होते. बायडेन म्हणाले होते, “आम्ही तुम्हाला (हल्लेखोरांना) पकडू आणि शिक्षा करू.” त्यांनी व्हाइट हाऊस येथे पत्रकारांना सांगितले गुरुवारी, “ज्यांनी हा हल्ला केला आणि अमेरिकेला हानी पोहोचवण्याचा हेतू ठेवला आहे, त्यांनी लक्षात ठेवावे की आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हे आम्ही विसरणार नाही. आम्ही तुम्हाला पकडू आणि शिक्षा करू. मी माझ्या देशाचे हित आणि लोकांचे रक्षण करीन.”

इसिस-केने काबूल विमानतळाजवळ झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. इस्लामिक स्टेट खोरासन प्रांताला ISIS-K, ISKP आणि ISK म्हणूनही ओळखले जाते. हे अधिकृतपणे अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या इस्लामिक स्टेट चळवळीशी संलग्न आहे. इराक आणि सीरियामध्ये कार्यरत असलेल्या इस्लामिक स्टेटच्या मुख्य नेतृत्वाकडून याला मान्यता मिळालेली आहे.

Now us airstrike ON ISIS-K, targets Mastermind Of Kabul airport blast afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती