विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच कोरोना संपेल, असा आशावाद वॉशिंग्टनमधील विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी व्यक्त केला आहे.महमूद यांनी म्हटले आहे की, कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही, आणि तो संपेल. हा एक प्रकारचा खेळ आहे आणि या खेळात कोणीही विजेता नाही, हा ड्रॉ होणार आहे.No epidemic is permanent, corona will soon be gone, says Washington-based virologist
एक वेळ येईल जेव्हा हा विषाणू लपून जाईल आणि आपण खरोखरच जिंकू. आपल्याला आपल्या मास्कच्या मागे लपून राहावं लागणार नाही, त्यापासून आपली सुटका होईल. या क्षणाच्या आपण खूप जवळ आलोय, असं मला वाटतं. जसजसे आपण या वर्षात पुढे जाऊ, तसतसं आपण लवकरच महामारीतून बाहेर येऊ.
विषाणूवर उत्परिवर्तित होण्यासाठी आणि मानवातील बदलत्या प्रतिकारशक्तीशी जुळवून घेण्याचा दबाव असतो आणि मग तो या नवीन प्रकारांना बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते सुटू शकतील, असे सांगून महमूद म्हणाले, हा एक बुद्धिबळाच्या खेळासारखा खेळ आहे. विषाणू आणि मानव यांच्यात हे एक साधर्म्य आहे, असं मी म्हणेल.
मानवाच्या आणि विषाणूंच्या हालचाली सुरू आहे. आपण बचावासाठी मास्क, हँड सॅनिटायझर्स, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहोत. आपल्याकडे लस, अँटीव्हायरल आणि अँटिबॉडिज ही शस्त्रे आहेत, जी आपण करोना विरुद्ध वापरली आहेत,ह्व असं डॉ. कुतुब यांनी सांगितलं.
भारतानं वर्षभरात तब्बल ६० टक्के लसीकरणाचे ध्येय गाठल्याबद्दल कौतुक करताना मेहमूद म्हणाले, देशासाठी आणि भारतातील लस उत्पादकांसाठी ही खरोखर मोठी उपलब्धी आहे. भारतीय लसी जागतिक स्तरावर वापरल्या जातात. गेल्या वर्षी यावेळी आपण या लसींना मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेत होतो.
त्यानंतर आपातकालीन वापराची परवानगी मिळाली आणि १२ महिन्यांत आपण जवळपास ६० टक्के लसीकरण साध्य केले आहे, ही भारत सरकार, आरोग्य मंत्रालय आणि लस उत्पादकांसाठी मोठी उपलब्धी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App