विशेष प्रतिनिधी
काबूल – जोपर्यंत इस्लामिक वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत काबूल विद्यापीठात महिलांना शिकवण्यात किंवा शिक्षण घेण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे तालिबानने नियुक्त केलेला कुलगुरू मोहंमद अश्रफ घैरत याने आज ट्विट करून सांगितल्याचे सीएनएनने म्हटले आहे. No entry for womens in Kabul University
जोपर्यंत सर्वांना खरे इस्लामिक वातावरण मिळत नाही, तोपर्यंत महिलांना विद्यापीठात येण्याची आणि काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे त्याने म्हटले आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर विद्यापीठाचे नवीन धोरण आज जाहीर करण्यात आले आहे.
विद्यापीठाचा हा नवा आदेश १९९० च्या दशकातील तालिबानची राजवटीची आठवण करून देणारा आहे. त्यावेळी पुरुष नातेवाईक असेल तरच महिलांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली जात होती.या आदेशाचे पालन न केल्यास महिलेस मारहाण केली जात होती आणि शाळेपासून त्यांना पूर्णपणे दूर ठेवले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App