विशेष प्रतिनिधी
ब्रुसेल्स – आम्ही त्यांना विसरणार नाही, अशा शब्दांत नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी मागे राहिलेल्या अफगाण नागरिकांना मदतीचा हात कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.NATO will create pressure on Taliban for Afghan peoples
परदेशी सैन्याला मदत केलेल्या आणि आता मायदेशात राहण्यात धोका वाटत असलेल्या अफगाण नागरिकांना बाहेर पडू द्यावे म्हणून मित्र देश इस्लामी दहशतवाद्यांवर राजनैतिक दबाव कायम ठेवतील, असेही स्टोल्टनबर्ग यांनी ठामपणे सांगितले.
ते म्हणाले की, अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर पडू दिले जाईल असे तालिबानने स्पष्टपणे सांगितले आहे. अर्थात तालिबान काय म्हणते यापेक्षा कृती काय करते यानुसार आम्ही अंदाज घेऊ. मायदेश सोडण्याची इच्छा असलेल्या, मात्र ते शक्य न झालेल्यांना तेथून बाहेर पडता यावे म्हणून मित्र देश तसेच इतर देशांच्या साथीत नाटो प्रयत्नशील राहील.
युरोपीय महासंघाच्या माहितीनुसार २०१५ पासून युरोपमध्ये आश्रय मिळावा म्हणून सुमारे पाच लाख ७० हजार अफगाणींनी अर्ज केला आहे. अमेरिका आणि मित्र देशांनी एक लाख २३ हजार पेक्षा जास्त नागरिकांची सुटका केली.
१४ ऑगस्टपासून अमेरिकी लष्करी विमानांतून सुटका करण्यात आलेल्यांची संख्या ७९ हजारहून जास्त आहे. यात अमेरिकेचे ५५२६, तर इतर अफगाणिस्तानसह इतर देशांच्या ७३ हजार ५०० नागरिकांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App