अमेरिकेतील अत्यंत अवघड अशा ‘सॅट’ आणि ‘ॲक्ट’ परीक्षेत नताशा पेरीचे दैदीप्यमान यश

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – अमेरिकेतील अत्यंत अवघड अशा ‘सॅट’ आणि ‘ॲक्ट’ परीक्षेत देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारतीय वंशाच्या नताशा पेरी (वय ११) हिला जगातील सर्वांत बुद्धीमान विद्यार्थ्यांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आले आहे.Natasha achieved big success

या ‘सीटीवाय’ला 84 देशांमधील 19 हजार विद्यार्थी बसले होते. या परीक्षेमध्ये जगभरातील विद्यार्थ्यांची अत्यंत अवघड परीक्षा घेतली जाते. नताशा हिने 90 पसेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळविले.अमेरिकेत विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ‘सॅट’ किंवा ‘ॲक्ट’ परीक्षेतील त्यांचे गुण सादर करावे लागतात. न्यूजर्सी येथील शाळेत शिकणाऱ्या नताशा हिने जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथ (सीटीवाय) या बुद्धीमान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी घेतलेल्या या परीक्षांमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली. अनेक महाविद्यालयांमध्ये स्कॉलरशीप ॲसेसमेंट टेस्ट (सॅट) आणि अमेरिकन कॉलेज टेस्टिंग (ॲक्ट) या परीक्षांच्या आधारेच प्रवेश देतात.

Natasha achieved big success

महत्त्वाच्या बातम्या