विशेष प्रतिनिधी
बीजिंग – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रथमच तिबेटचा दौरा केला. यावेळी त्यांनी अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवरील न्यींगची गावाला भेट दिली होती, असे चिनी माध्यमांनी जाहीर केले आहे. Jinping visist indo – china border
भारत-चीन सीमेवरील या गावाला भेट देणारे ते पहिलेच चिनी अध्यक्ष ठरले आहेत. या भेटीबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. या दौऱ्यात जिनपिंग यांनी न्यांग नदीवरील पुलाची पाहणी केली.
जिनपिंग हे बुधवारी (ता. २१) न्यींगची गावात आले होते आणि स्थानिकांनी त्यांचे स्वागत केले, असे वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. ब्रह्मपुत्रेच्या पात्रातील पर्यावरण जतनाबाबतचाही त्यांनी आढावा घेतला.
या नदीवर एक प्रचंड धरण बांधण्याची चीन सरकारी योजना असून १४ व्या पंचवार्षिक योजनेत त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या या प्रकल्पाबाबत भारत आणि बांगलादेशने चिंता व्यक्त केली आहे.
अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचा दावा असून भारताने तो स्पष्टपणे आणि वारंवार फेटाळला आहे. दोन्ही देशांमधील सीमावादावरून सध्या तणाव असतानाच जिनपिंग यांनी न्यींगची गावाला भेट दिली आहे.चिनी नेत्यांनी तिबेटला वारंवार भेटी दिल्या आहेत. मात्र, सीमेला लागूनच असलेल्या गावाला भेट देणारे ते पहिलेच सर्वोच्च नेते ठरले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App