इस्राईलच्या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाइनमधे २४ जणांचा मृत्यू, आखातातील संघर्ष पुन्हा पेटला


विशेष प्रतिनिधी

जेरुसलेम – इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाने अधिक हिंसक वळण घेतले असून रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने गाझा येथे केलेल्या प्रतिहल्ल्यात किमान २४ जणांचा मृत्यू झाला. पॅलेस्टाइनमधील कट्टरतवादी हमास या संघटनेच्या ताब्यात असलेल्या स्थानांवर हा हल्ला करण्यात आला. Istrayal attack on Palestine, 24 died

जेरुसलेम शहरावर पॅलेस्टाइन आणि इस्राईल या दोघांचा दावा आहे. यावरून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. या संघर्षाला काही आठवड्यांपुर्वी पुन्हा तोंड फुटले असून वेस्ट बँक, गाझा पट्टी येथेही शेकड्यांच्या संख्येने अरब समुदायातील लोक एकत्र येत इस्राईलचा निषेध करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून इस्राईलचे सैनिक या जमावावर अश्रुधुराचा मारा केला आहेत. यामध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक जखमी झाले आहेत.


इस्रायलमध्ये घुमला ‘ऊँ नम: शिवाय’ मंत्र , भारत कोरोनामुक्त होऊ दे ; शिव शंकराला साकडे


गेल्या काही आठवड्यांपासून जेरुसलेममध्ये इस्राईलचे सैनिक आणि पॅलेस्टीनी नागरिकांमध्ये संघर्ष सुरु आहे. गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी सोमवारी रात्रीपासून इस्राईलच्या दिशेने रॉकेट हल्ले सुरु केले. त्यांनी जवळपास २०० रॉकेट डागले.

यामध्ये इस्राईलचे सहा नागरिक जखमी झाले. इस्राईलने तातडीने प्रत्युत्तर देत हवाई हल्ला केला. यात २४ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी १५ जण दहशतवादी असल्याचा इस्राईलचा दावा असला तरी यामध्ये ९ बालकांचा मृत्यू झाल्याचा हमासचा आरोप आहे.

Istrayal attack on Palestine, 24 died

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात