सौम्या संतोष यांच्या नातेवाईकांना इस्त्रायल नुकसानभरपाई देणार; भारतातल्या इस्त्रायली उपराजदूतांची घोषणा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेने इस्त्रालयमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यात मूळच्या केरळमधल्या केअर टेकर सौम्या संतोष यांना प्राण गमावले आहेत. या हल्ल्याची इस्त्रायलने गंभीर दखल घेतली असून सौम्या संतोष यांच्या परिवाराशी इस्त्रायली राजदूतांनी संपर्कही साधला आहे. त्यांच्या परिवाराला इस्त्रायलकडून नुकसानभरपाई देण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतातल्या उपराजदूत रॉनी येदीदी क्लेइन यांनी केली आहे. Israel will compensate Soumya Santosh’s relatives

सौम्या संतोष मूळच्या केरळच्या इडूकीमधल्या. त्यांचा परिवार तेथे राहतो. सौम्या संतोष यांच्यामागे पती आणि ९ वर्षांचा मुलगा आहे. हा मुलगा आता आईच्या मायेविना वाढेल. संपूर्ण इस्त्रायल सौम्या संतोष यांच्या परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही राजदूत रॉन मालका यांनी यापूर्वीच दिली आहे. याच्यापुढे जाऊन इस्त्रायलने सौम्या संतोष यांच्या परिवाराला नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.

याबाबत उपराजदूत रॉनी येदीदी क्लेइन म्हणाल्या, की कोणत्याही गेलेल्या अनमोल जीवाची भरपाई कोणी करू शकत नाही. परंतु, केअर टेकर म्हणून सौम्या संतोष यांनी इस्त्रायली नागरिकांची जी सेवा केली, तिच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्या परिवाराचे पालनपोषण इस्त्रायली सरकार करेल. त्यांच्या परिवाराच्या इच्छेनुसार ते इस्त्रायलमध्ये राहू शकतील. त्यांची तेथे इस्त्रायली परिवारासारखी काळजी घेतली जाईल.

भारतातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सौम्या संतोष यांच्या परिवाराच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह भारतात आणण्यात येईल आणि त्यांच्या मूळ गावी अंतिम संस्कार करण्यात येतील.

Israel will compensate Soumya Santosh’s relatives

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण