पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था करतेय तालिबानचे व्यवस्थापन – सालेह यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

लंडन – युद्धग्रस्त अफगाणिस्तान ही पाकिस्तानची वसाहतच आहे. तालिबानचे सुक्ष्म व्यवस्थापन आयएसआय ही पाकची कुख्यात गुप्तचर संस्था करते, असे मत अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अम्रुल्लाह सालेह यांनी केले.ISI is supporting Taliban in Afghanistan

पाकचे कडवे टीकाकार अशी सालेह यांची ओळख आहे. इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआयबद्दल त्यांनी ठामपणे सांगितले की, अक्षरशः दर तासाला पाक वकिलातीच्या मार्फत तालिबानच्या प्रवक्त्याला सूचना दिल्या जातात.

पाकचे वर्चस्व फार काळ टिकणार नाही. त्यांचे या प्रांतावर नियंत्रण आहे, मात्र भूभाग नियंत्रणात आणला म्हणजे तेथील जनता किंवा स्थैर्यावर ताबा मिळाला असे नाही हे इतिहास सांगतो.सालेह म्हणतात, तालिबानने सत्ता मिळविली असली तरी त्यांनी देशवासीयांचे ह्रदय आणि मने जिंकलेले नाही. दमछाक झालेल्या अमेरिकी अध्यक्षांच्या सदोष धोरणाचा गैरफायदा तालिबानने उठविला.

पाश्चात्त्यांनी अफगाणिस्तानचा मोठा विश्वासघात केला आहे. पाश्चात्त्यांनी तालिबानसमवेत राजकीय तोडगा काढावा, ज्यास अफगाण जनता आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा असेल. पाश्चात्त्यांनी आम्हाला केवळ नैतिक आणि शक्य असेल तेव्हा वस्तूंच्या रूपाने पाठिंबा द्यावा.

ISI is supporting Taliban in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात