इन्स्पिरेशन४ मिशन नंतर स्पेसएक्स फ्लाईट मध्ये सफर करण्याची नागरिकांची उत्सुकता वाढली

विशेष प्रतिनिधी

फ्लोरिडा: इन्स्पिरेशन४ मिशनच्या अंतर्गत स्पॅसेक्स फ्लाईटने केलेल्या यशस्वी उड्डाणानंतर नागरिकांचे त्याकडे लक्ष वेधले आहे. स्पेसेक्सची आगामी  उड्डाणे तसेच स्पेस फ्लाइट्सच्या खर्चाबद्दल मोठ्या प्रमाणावर चौकशी केली जात आहे. कंपनीने नेमका किती खर्च होईल याबाबत कुठलेही स्पष्टीकरण केलेले नाही. परंतु त्यांनी स्पेसफ्लाईटवर होणारा खर्च कमी केला गेला असल्याचे बोलले जात आहे.

Increase in enquiries of SpaceX flights since successful Inspiration4 mission

स्पॅसेक्स कंपनीने याबाबत चर्चा करण्यासाठी एक परिषद आयोजित करण्याचे ठरविले आहे. स्पॅसेक्स चे वरिष्ठ संचालक बेंजी रीड म्हणाले की, लाखो लोकांनी स्पेस फ्लाईट मध्ये सफर करण्यासाठी किती खर्च येईल, त्याचबरोबर ड्रॅगन कृ आणि स्टारशिप कडून प्रवास करण्यासाठी तिकिटाचा खर्च किती असेल याबाबत मोठ्या प्रमाणावर चौकशी केली.


SpaceX Inspiration4 : तीन दिवस अंतराळात घालवून रचला नवा विक्रम, स्पेसएक्सचे चार हौशी अंतराळवीर पृथ्वीवर परतले


जरी तिकिटाची किंमत किंवा स्पेसफ्लाईट मध्ये प्रवास करण्यासाठीचा खर्च सांगितला गेला नसला तरी एवढे मात्र कळाले की, सात लोकांना पाठवण्यासाठी कंपनीला प्रतिसीट $५५ दशलक्ष खर्च झालेला होता. (ISS कडे पाठविलेल्या क्रू ड्रॅगन अंतराळवीरांच्या संदर्भावरून)

Increase in enquiries of SpaceX flights since successful Inspiration4 mission

 

महत्त्वाच्या बातम्या