विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद -: वाढता भ्रष्टाचार आणि महिलांविरोधात लैंगिक अत्याचार या दोन गोष्टींचा मुस्लिम जगाला विळखा पडला आहे, असे परखड मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे. नेहमी आपल्या बिनधास्तपणासाठी खेळाडू म्हणून परिचित असलेल्या इम्रान खान यांनी आता मुस्लीम जगताला आरसा दाखविला आहे.Imran targets Muslim world
येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात इम्रान यांनी सहभाग घेतला होता. यावेळी अनेक मुस्लिम विचारवंत उपस्थित होते. सोशल मीडियाचे धर्मावर आणि श्रद्धेवर अतिक्रमण होत असून ते कसे रोखता येईल, याबाबत यावेळी चर्चा झाली.
यावेळी बोलताना इम्रान खान म्हणाले की,‘समाजात सध्या दोन दुष्टप्रवृत्ती दिसून येत आहेत. लैंगिक अत्याचारांचे गुन्हे प्रचंड प्रमाणात वाढले असून केवळ एक टक्का गुन्ह्यांचीच नोंद घेतली जाते. त्यामुळे याविरोधात आपल्याला लढावे लागेल. भ्रष्टाचाराचेही वाढते प्रमाण चिंताजनक आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App