इम्रान खान यांचा राजीनामा देण्यास नकार; पंतप्रधान पदाची इनिंग शेवटपर्यंत खेळणार


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची संकटात आली आहे. परंतु लष्कराने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. परंतु त्यांनी तो देण्यास नकार दिला असून शेवटच्या चेंडू पर्यंत खेळत राहणार असल्याचे सांगितले. Imran Khan refuses to resign: The PM’s innings will be played till the end

२५ ते २८ मार्च दरम्यान नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर मतदान होऊ शकते. त्यांच्या१८ ते २० खासदारांनी बंड केल्याने इम्रान सरकार अल्पमतात आले आहे., पण इम्रान स्वतः ताकद दाखवत आहेत. बुधवारी खान म्हणाले – जे माझा राजीनामा मागतात त्यांनी नीट ऐका.

शेवटच्या चेंडूपर्यंत कसे खेळायचे हे मला माहीत आहे. मी राजीनामा देणार नाही. माझ्याकडे हुकमाचा एक्का शिल्लक आहेत. हे पाहून जगालाही आश्चर्य वाटेल.
एका प्रश्नाला उत्तर देताना खान म्हणाले – काहीही झाले तरी मी कोणत्याही किमतीत राजीनामा देणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत मी सामना खेळेन. विरोधी पक्षाचाच दबाव आहे. यापेक्षा मी काही बोलणार नाही.

Imran Khan refuses to resign: The PM’s innings will be played till the end

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात