विशेष प्रतिनिधी
तेहरान : इराणच्या अध्यक्षपदी कट्टरतावादी इब्राहिम रईसी (वय ६०) यांनी एकहाती विजय मिळविला. देशाच्या इतिहासात प्रथमच या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वांत कमी होती.Ibrahim Raise will next PM of Iran
देशाचे सर्वोच्च नेते आयोतल्लाह अली खामेनी यांच्या नेतृत्वाखालील समितीने निवडणुकील तुल्यबळ उमेदवारांना अपात्र ठरविल्याने रईसी यांची बाजू निवडणुकीत वरचढ झाली होती. मोहसीन रेजाई आणि आमीर हुसेन कजिजदाह हाश्मी हे आणखी दोन कट्टरतावादी उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या दोघांनीही हार मानत रईसी यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.
रईसी हे इराणच्या न्यायालयाचे प्रमुख आहेत. खामेनी यांच्या निकटचे मानले जाणारे रईसी ऑगस्टमध्ये अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. याच काळात इराण व अमेरिकेत अण्वस्त्र कराराबाबत पुन्हा चर्चा सुरु होणार आहे.
अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे देशाचा अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन आणि राजकीय स्पर्धकांच्या खुनाचा आरोप रईसी यांच्यावर असल्याने अमेरिकेने त्यांच्यावर बंदी घातली आहे.अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी (ता.१८) झाली. त्याआधीच दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणात पाच उमेदवार होते.
सुधारणावादी उमेदवार आणि माजी उपाध्यक्ष मोहसीन मेहरालिजादेह यांनी माघार घेतल्याने सेंट्रल बँकेचे माजी गव्हर्नर अब्दुलनासर हेममती यांच्या विजयाची शक्यता वाढली होती. पण त्यांची उमेदवारी खोमेनी यांनी रद्द केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App