विशेष प्रतिनिधी
दुबई – पुणे, मुंबईने वडापाव सातासमुद्रापार नेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्वस्त आणि मस्त वडापाववर रोज लाखो लोक ताव मारतात. मात्र याच वडापावची किंमत दुबईत चक्क १९७० रुपयांपर्यंत वाढली आहे. अर्थात त्याचे कारणही अगदी तसेच आहे. Golden vada pav will introduce in Dubai
ओ’पाओ नावाच्या रेस्टॉरंटच्या कल्पक चालकाने २२ कॅरेट सोन्याचे अंश असलेला जगातील पहिला वडा पाव बनविला आहे. करामा आणि अल क्योझ अशा दोन ठिकाणी त्यांची सेंटर असून तेथे प्रत्यक्ष जाऊन हा वडा पाव खाता येईल.
सोन्याशिवाय यात ट्रफल हे खाण्यायोग्य फंगी असलेले लोणी आणि चीज आहे. या वडापावच्या जोडीला रताळ्याचे फ्राइज आणि गोड लिंबूसरबतही सर्व्ह केले जाते. ही डिश सुशोभित करण्यासाठी सोन्याच्या पानांचा वापर करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी दुबईतील एका हॉटेलमध्ये २४ कॅरेटचे खरे आणि खाण्यायोग्य सोने असलेला बर्गर बनविला होता.
या रेस्टॉरंटने आपल्या इन्स्टा हँडलवर जाहिरातीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुबक नक्षीकाम केलेल्या लाकडी बॉक्समधून वडा पाव सर्व्ह केला जातो. हा बॉक्स उघडताच पांढरी वाफ बाहेर येते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App