फ्रान्स धावला भारताच्या मदतीला; काबूलमधून केली २१ नागरिकांची सुखरूप सुटका


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे अडकलेल्या २१ भारतीयांची सुखरूप सुटका झाली. या मागे भारताचा मित्र फ्रान्सने मोलाची मदत केली आहे. France rushed to India’s aid; From Kabul Kelly 21 citizens released safely

फ्रान्सचे राजदूत इमैनुएल लेनिन यांनी याबाबतची माहिती ट्विट करून दिली. फ्रान्सच्या एका विमानाने काल काबूल येथुन उड्डाण केले. त्यामध्ये २१ भारतीय नागरिकांचा समावेश होता.

अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांनी वेडेवाकडे पाऊल उचलले किंवा अन्य देशांच्या नागरिकांना त्रास दिला तर संभाव्य संकटाला भारत आणि फ्रान्स एकसाथ असतील.

दुर्बळ राष्ट्रपतीमुळे अफगाणिस्तान तालिबान्यांच्या घशात

अफगाणिस्तानात अनेक देशांचे नागरिक अडकून पडले आहेत. अमेरिकेने सैन्य काढून घेण्याची प्रक्रिया सुरु केली. दुसरीकडे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी ३ लाखांवर अत्याधुनिक हत्यारांनी सुसज्ज सैन्य असतानाही तालिबनशी थेट लढाई केली नाही.

काबूलवर तालिबानी चालून येत असताना त्यांच्याशी युद्ध केले नाही. प्रत्येक प्रांत तालिबानी घेत असताना त्यांच्यावर हल्ले चढविण्यास आदेश दिले नाहीत. सुसज्ज लष्कर असताना तालिबनचा पाडाव करणे शक्य असताना रणांगण आणि देश सोडून राष्ट्रपती अश्रफ गनी पळून गेले. तालिबान्यांना तोडीस तोड उत्तर दिले असते तर आज ही परिस्थिती अफगाणिस्तानात नसती.

France rushed to India’s aid; From Kabul Kelly 21 citizens released safely

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात