पॅरिस – फ्रान्समधील आघाडीचे ऑनलाइन शोध नियतकालिक मीडियापार्टच्या दोन पत्रकारांच्या फोनमध्ये पेगॅसस या स्पायवेअरचे अस्तित्व आढळून आले आहे. देशातील आघाडीची सायबर सिक्युरिटी संस्था ‘एएनएसएसआय’ने याला दुजोरा दिला आहे.France agency accept pegasis spyware
एखाद्या देशाच्या तपाससंस्थेने या स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवल्याची बाब मान्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.याआधी ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला होता.
इस्राईलमधील तपाससंस्थेने एनएसओ ग्रुपच्या चौकशीला सुरुवात केली असून या कंपनीनेच या स्पायवेअरची निर्मिती केली आहे. मीडियापार्टसह जगभरातील १७ बड्या माध्यमसंस्था या स्पायवेअरच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या पाळतप्रकरणाचा मागोवा घेत आहेत. भारतातील द वायरचा देखील यात समावेश आहे.
दरम्यान इस्राईलमधील अनेक तपाससंस्थांचे अधिकारी हे एनएसओच्या कार्यालयांची झडती घेऊ लागले असून जगभरातून या कंपनीवर होत असलेल्या आरोपांची चौकशी केली जात असल्याचे इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. या कारवाईचा तपशील उघड करण्यास मात्र त्याने नकार दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App