जपानची माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; माजी नौसैनिकाच्या गोळीबारात प्राण गमावला; आंतरराष्ट्रीय कटाचा संशय!!


वृत्तसंस्था

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या झाली आहे. जपानच्या माजी सैनिकाच्या गोळीबारात त्यांना प्राण गमवावे लागले. शिंजो आबेंवर माझी नौसैनिकाने ‘कॅमेरा गन’ने हल्ला केला. पत्रकार म्हणून आलेल्या हल्लेखोराने हँडमेड गनने केला गोळीबार, हल्ल्यानंतर तिथेच थांबून राहिला होता. सुरक्षा रक्षकाने त्याला अटक केली आहे. Former Japanese Prime Minister Shinzo Abe assassinated

गोळीबारानंतर उजेडात आलेल्या फोटो आणि व्हिडिओ मधून हा खुलासा झाला आहे. गन कॅमेऱ्यासारखी दिसावी यासाठी हल्लेखोराने गन काळ्या रंगाच्या पॉलिथीनने गुंडाळली होती. त्याने अवघ्या काही मीटर अंतरावरुन आबेंना गोळ्या घातल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. मात्र या हत्तीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड धक्का बसला असून यामागे कोणता आंतरराष्ट्रीय कट आहे का याविषयी संशय वाढला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात सिंधू आहे कट्टर चीन विरोधी म्हणून ओळखले ओळखले जात होते. त्याचबरोबर चीन विरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवरची व्यूहरचना करण्यात देखील त्यांचा पुढाकार राहिला होता.



 

हल्लेखोर छायाचित्र काढण्याच्या निमित्ताने शिंजो आबेंच्या जवळ आला. त्यानंतर त्याने आबेंना पाठीमागून 2 गोळ्या घातल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्लेखोर यामागामी तेत्सुया याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शिंजो आबे तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठविले परंतु त्यांना आधीच हार्ट अटॅक आल्यामुळे ते उपचारांना प्रतिसाद देऊ शकले नाही आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

हल्लेखोर काहीवेळ तिथेच उभा राहिला

माध्यमांच्या वृत्तानुसार, यामागामी तेत्सुया यापूर्वी मेरिटाइम सेल्फ डिफेंस फोर्सचा सदस्य होता. त्याने हा हल्ला का केला? हे अद्याप समजले नाही. पण गोळीबार केल्यानंतर तो काही काळ घटनास्थळीच उभा राहिला. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या. सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे.

जगातील सर्वात कठोर गन कायदा जपानमध्ये आहे. त्यामुळे येथे गोळीबाराच्या घटनांत बळी जाणाऱ्यांचा वार्षिक आकडा एकेरी संख्येपुरताच मर्यादित राहतो.

Former Japanese Prime Minister Shinzo Abe assassinated

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात