प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी झाला विवाहबद्ध


विशेष प्रतिनिधी

जर्मनी : प्रसिध्द यूट्यूबर ध्रुव राठी नुकताच विवाहबद्ध झाला आहे. सात वर्ष डेट केल्या नंतर गर्लफ़्रेंड जूलीसोबत त्याने 24 नोव्हेंबर रोजी विवाह केला. व्हिएन्नामध्ये एका पॅलेसमध्ये त्याचा हा विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास फक्त 24 लोक उपस्थित होते. आपल्या युट्यूब व्हीडिओंमुळे ध्रुव राठी प्रचंड फेमस आहे. खोलात जाऊन केलेला अभ्यासू व्हिडीओ आणि अतिशय उत्तम असे त्याचे व्हिडिओ असतात.

Famous YouTuber Dhruv Rathi got married


सरकारला जाग येऊ दे, नटराजाकडे कलाकारांची प्रार्थना


2014 मध्ये प्रथम तो ज्युली हिला भेटला होता. आणि नेमके त्याचवर्षी त्याने युट्यूब चॅनेल देखील चालू केले. 6.28 मिलियन इतके सब्स्क्रायबर्स त्याच्या युट्यूब चॅनलचे आहेत. पाच वर्ष डेट केल्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंड सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 2019 च्या व्हॅलेंटाईन डे दिवशी त्याने आपले रिलेशनशिप पब्लिकली सांगितले. दोघेजण बऱ्याच वेळा फिरण्यासाठी जात असतात. म्हणून 2020 साली त्यांनी आणखी एक युट्यूब चॅनल सुरू केले आहे. या चॅनेलवर ते आपल्या प्रवासाचे बरेच व्हिडिओ शेअर करत असतात.

Famous YouTuber Dhruv Rathi got married

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था