मृत प्रवासी नायजेरियन नागरिक असल्याची माहिती समोर
प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली-दोहा प्रवास करणाऱ्या इंडिगो विमानातील एका प्रवाशाची विमानात अचानक तब्येत बिघडल्याने, या विमानाचे पाकिस्तानमधील कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिग करण्यात आले. इंडिगो एअरलाइन्सने सांगितले की, विमानतळावरील वैद्यकीय पथकाने तपासणीनंतर प्रवाशाला मृत घोषित केले. Doha bound Indian flight makes emergency landing at Karachi after passenger dies
हा प्रवासी नायजेरियन नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सच्या 6E-1736 या विमानातील एका प्रवाशाला प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटत होते. यानंतर वैमानिकाने कराची एअर ट्रफिंग कंट्रोलशी संपर्क साधला आणि मेडिकल इमरजन्सीबाबत कळवले होते.
Doha-bound Indian flight makes emergency landing at Karachi after passenger dies Read @ANI Story | https://t.co/xQAAENUgJ9#IndianFlight #Karachi #EmergencyLanding #Doha #IndiGo #Pakistan pic.twitter.com/ICLSypkhQ1 — ANI Digital (@ani_digital) March 13, 2023
Doha-bound Indian flight makes emergency landing at Karachi after passenger dies
Read @ANI Story | https://t.co/xQAAENUgJ9#IndianFlight #Karachi #EmergencyLanding #Doha #IndiGo #Pakistan pic.twitter.com/ICLSypkhQ1
— ANI Digital (@ani_digital) March 13, 2023
कराचीमधील नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या प्रवक्त्यानेही याबाबत पुष्टी केली, की भारतीय विमान कंपनीचे विमान दिल्लीहून दुबईला जात असताना एका प्रवाशांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे इंडिगो विमानाच्या वैमानिकाने मेडिकल इमरजन्सीमुळे आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती, जी कराची विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रकाने मंजूर केली. अब्दुल्ला (६०) असे प्रवाशाचे नाव असून तो नायजेरियन नागरिक आहे. मात्र, विमान उतरण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. CAA आणि NIH च्या डॉक्टरांनी प्रवाशाचे मृत्यू प्रमाणपत्र जारी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App