पाकिस्तानी लष्करासोबतचा पंतप्रधान इम्रान खान यांचा हनीमून संपला असून आता लष्कर त्यांच्या विरोधात गेले आहे. इम्रान खान यांच्यापेक्षा नवाझ शरीफ यांना लष्कराची पसंती असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानात सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे.Dislikes Imran Khan, likes Nawaz Sharif, Pakistani military role changed
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्करासोबतचा पंतप्रधान इम्रान खान यांचा हनीमून संपला असून आता लष्कर त्यांच्या विरोधात गेले आहे. इम्रान खान यांच्यापेक्षा नवाझ शरीफ यांना लष्कराची पसंती असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानात सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे.
माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हाती पुन्हा एकदा सत्ता सोपवली जाऊ शकते, अशी चचार्ही सुरू आहे. इम्रान खान यांना पदावरून दूर करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. पाकिस्तानी लष्करानं सध्या लंडनमध्ये राहणाऱ्या नवाज शरीफ यांच्यासोबत एक गोपनीय सौदा पक्का केल्याची जोरदार चर्चा पाकिस्तानी मीडियात सुरू आहे. पाकिस्तानी मीडियाच्या कयासानुसार, लवकरच पंतप्रधान इम्रान खान यांना पदावरून बाजुला सारत पुन्हा एका नवाझ शरीफ यांना एन्ट्री दिली जाणार आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानात परतणार असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानी लष्कराशी असलेल्या मतभेदांमुळे इम्रान खान यांना पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नवाझ शरीफ नोव्हेंबर २०१९ पासून लंडनमध्ये स्थलांतरीत झाले आहेत. लष्कराच्याच विरोध सहन करावा लागल्यानं शरीफ यांना आपली खुर्ची गमवावी लागली होती. नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पाकिस्तानात भ्रष्टाचाराचे अनेक खटले दाखल करण्यात आलेले आहेत.
पाकिस्तानी मीडियाच्या म्हणण्यानुसार, नवाझ शरीफ यांना मायदेशात परत आणण्यासाठी लष्कराकडून गेल्या तीन महिन्यांपासून रणनीती बनवण्याचं काम सुरू आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मेहेरबानीमुळेच इम्रान खान यांना सत्ता मिळाली होती. परंतु, देशात नीती लागू करण्यात ते सपशेल अपयशी ठरल्याचं लष्कराचं म्हणणं आहे. महागाई, देशावरील वाढतं कर्ज आणि कथित कुशासन यांसाठी इम्रान खान सरकारवर टीकेचा भडीमार होतोय.
काही महिन्यापूर्वीच इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफ यांचा गढ मानल्या जाणाऱ्या खैबर-पख्तूनख्वा भागात स्थानिक निवडणुकांत पराभूत झाला होता. भ्रष्टाचाराचे अनेक खटले दाखल असलेले नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्यानंतर काय? हा प्रश्न आहेच. यालाही पाकिस्तानी सैन्यानं उत्तर शोधून काढल्याचं पाकिस्तानी मीडियाचं म्हणणं आहे.
लष्कराच्या रणनीतीनुसार, नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्यानंतर काही महिने तुरुंगात काढतील. त्यानंतर लष्कर आणि न्यायालय मिळून नवाझ यांच्याविरोधातील खटले निकालात काढतील. त्यानंतर शरीफ यांचा सत्तेत परतण्याचा मार्ग मोकळा होईल. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानात लष्कर आणि आयएसआय सरकार बनवण्यासाठी आणि पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App