विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : कोरोनाच्या ओमायक्रॉनने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची त्सुनामी आल्यासारखे वातावरण आहे. सोमवारी एका दिवसात दहा लाख नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.अत्यंत वेगाने ओमायक्रॉनमुळे व्हेरिएंटमुळे सध्या अमेरिकेत विक्रमी संख्येत रूग्ण आढळून येत आहेत.Corona tsunami in US, one million affected in one day
ही संख्या अन्य देशांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. दोन वर्षांपूर्वी महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत नोंदवला गेलेला हा एक उच्चांक आहे. सोमवारी अमेरिकेत आढळलेली रूग्ण संख्या ही केवळ चार दिवसांपूर्वी आढळलेल्या रूग्ण संख्येच्या दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. चार दिवसांपूर्वी अमेरिकेत ५ लाख ९० हजारांच्या आसपास रूग्ण आढळल्याचे समोर आले होते.
सोमवारी अमेरिकेतील दैनंदिन प्रकरणांची संख्या इतर कोणत्याही देशात पाहिल्या गेलेल्या संख्येपेक्षा दुप्पट होती. भारतातील डेल्टा वाढीदरम्यान यूएस बाहेर सर्वाधिक संख्या आली, जेव्हा ७ मे २०२१ रोजी ४१४००० हून अधिक रूग्ण आढळून आले. सध्या वाढत्या संसगार्मुळे विमानाची उड्डाणे रद्द झाली आहेत, शाळा आणि कार्यालये बंद आहेत, रूग्णालयांवरील भार वाढला आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांचे संपूर्ण लसीकरण होऊन त्यांनी बुस्टर डोस देखील घेतलेला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App