अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट, दिवसाला एक लाखापेक्षा जास्त रुग्ण


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. दिवसाला एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसात 1 लाख ते दीड लाखांच्या सरासरीनं रुग्ण वाढ होत आहे. दहा लाखांहून अधिक नागरिक रुग्णालयात उपचार घेत आहेत.Corona outbreak in the US, more than a one lakh patients a day

शनिवारी अमेरिकेत 1 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या 3 कोटी 91 लाख 54 हजार 269 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 6 लाख 37 हजार 314 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या सात दिवसात अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत 7 टक्के वाढ दिसून आली आहे. , मृतांच्या संख्येत 28 टक्के वाढ झाली आहे.



अमेरिकेत जानेवारी 2021 नंतर कोरोना रुग्णांच्या संख्येनं 1 लाखांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र, ऑगस्ट महिन्यात 1 लाखांपेक्षा अधिक रुग्णसंख्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर देखील उपाचाराचा ताण येत आहे.

कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावार वाढ होत आहे. या संसगार्चं कारण डेल्टा वेरिएंट सांगितले जात आहे. मात्र, डॉक्टर आणि संशोधकांचं एक निरीक्षण समोर आलं आहे. कोरोनामुळं रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये कोरोना लस न घेतलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील रुग्णसंख्येच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या अधिक असून परिस्थिती खराब असल्याचं देखील एफडीएच्या पॅनेलवरील सदस्यांनी डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Corona outbreak in the US, more than a one lakh patients a day

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात