विशेष प्रतिनिधी
ढाका – बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरे, नागरिक तसेच दुर्गापूजा मंडळांवर हल्ले होण्यास कारणीभूत ठरलेल्या घटनेतील मुख्य संशयित इक्बाल हुसेन याला बांगलादेश पोलिसांनी अखेर अटक केली.Contoversal person arrested in Bangaladesh
कोमीला येथे जवळच्या मशिदीतून कुराणची प्रत आणून त्याने ती दुर्गापूजा मंडपात ठेवल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून स्पष्ट झाले आहे. दुर्गेच्या चरणांपाशी कुराणची प्रत ठेवण्यात आल्याची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदूंवर हल्ले झाले. पोलिसांनी ३५ वर्षीय इक्बालचे नाव याआधीच जाहीर केले होते.
गुरुवारी रात्री कॉक्सबाजार समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात त्याला अटक करण्यात आली.हिंदूवरील हल्ल्यांचा संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) निषेध केला आहे. बांगलादेशमधील निवासी समन्वयक मिया सेप्पो यांनी सांगितले की, हे हल्ले बांगलादेशच्या राज्यघटनेतील मूल्यांच्या विरोधात आहेत. ते तातडीने थांबविले जाण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App