विशेष प्रतिनिधी
चेन्नई – झोमॅटो कंपनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्याच्या वर्तनावरून चर्चेत आली आहे. चेन्नईत झोमॅटोच्या एका कर्मचाऱ्याने हिंदी भाषेवरून ग्राहकाशी हुज्जत घातली. या वादाचे स्क्रीनशॉट संबंधित ग्राहकाने ट्विटरवर शेअर केले. त्यामुळे झोमॅटोने माफी मागत यापुढे पुन्हा सेवेची संधी द्याल, अशी अपेक्षा व्यक्त केली.Zomato once again gets in to trouble
संबंधित कर्मचाऱ्याला कमी केल्याचे झोमॅटोने जाहीर केलेले असताना काही तासाताच त्यास परत कामावर घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले.चेन्नईच्या विकास नावाच्या व्यक्तीने झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांना ऑर्डर मिळण्यास तांत्रिक अडचणी येऊ लागल्या होत्या.
यावर विकासने झोमॅटोच्या कस्टमर केअरशी चॅट करत रेस्टॉरंटशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावर झोमॅटोच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, आपण रेस्टॉरंटला पाच वेळेस फोन केला, परंतु भाषेच्या अडचणीमुळे योग्य बोलणे होऊ शकले नाही. यावर विकास म्हणाले, की झोमॅटो तमिळनाडूत सेवा देत असेल तर त्याने तमिळ भाषिक व्यक्तीला कामावर ठेवायला हवे होते.
ऑर्डर रद्द करून मला पैसे परत मिळवून द्यावेत. यावर कर्मचारी म्हणाला, की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे सर्वांना थोडीफार हिंदी येणे गरजेचे आहे. त्यावर विकास म्हणाले, की भाषेची समस्या ही माझी अडचण नाही.
आपण लवकरात लवकर पैसे परत करावेत. कस्टमर केअरशी चॅटिंग झाल्यानंतर विकासने या चॅटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले. त्याची झोमॅटोने दखल घेत ट्विटरवरून ग्राहकाची माफी मागितली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App