चीनमधील शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्यासाठी चीन सरकारने फतवा काढला आहे. मुस्लिम महिलांना गर्भनिरोधक साधने वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. एखाद्या महिलेला एकपेक्षा जास्त मूल असेल तर मोठा दंडही करण्यात येत आहे.Chinese government issues fatwa to reduce Muslim population, urges Uighur Muslim women to use contraceptives
विशेष प्रतिनिधी
बिजींग : चीनमधील शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्यासाठी चीन सरकारने फतवा काढला आहे. मुस्लिम महिलांना गर्भनिरोधक साधने वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.एखाद्या महिलेला एकपेक्षा जास्त मूल असेल तर मोठा दंडही करण्यात येत आहे.
चीनमध्ये एका बाजुला चीनी नागरिकांनी जास्तीत जास्त अपत्यांना जन्म द्यावा यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहे. कारण चीनचा जन्मदर घटत आहे. चीन तरुण-तरुणींमध्ये लग्न न करण्याचे प्रमाण वाढत आहे.
दुसऱ्यां बाजुला मात्र चीनमधील शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे.
महिलांनी गर्भनिरोधक साधने वापरणे बंधनकारक केले जात आहे. महिला गर्भवती झाल्यास त्यांना मोठा दंड केला जातो. कधी कधी तर तुरुंगातही डांबण्यात येते.
चीनमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाने लोकसंख्या कमी करण्यासाठी हे करत असल्याचा दावा केला जात असला तरी इतर भागात मात्र चित्र वेगळे आहे. चीनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गर्भनिरोधक साधनांचा वापर करणे ऐच्छिक आहे.
चीनमधील तुरुंगात अनेक महिलांना जास्त मुले झाल्यामुळे डांबून ठेवण्यात आले आहे. काही महिलांनी सांगितले की गर्भनिरोधक साधनांचा वापर केला नाही म्हणून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यांना पाळी बंद होण्याचे औषध देण्यात आले.काही महिलांवर तर बलात्कारही करण्यात आले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून चीन शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांवर अत्याचार करत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणयत येत आहे. अनेक ठिकाणी तरुंगही उभारण्यात आले आहेत. दाखवायला हे तुरुंग व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे असले तरी याठिकाणी डांबून ठेवले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App