लहान मुलांनाही लस देण्याची चीनने केली जय्यत तयारी, सायनोव्हॅकच्या लशीला परवानगी

विशेष प्रतिनिधी

बीजिंग : चीनमधील सायनोव्हॅक कंपनीने तयार केलेल्या कोरोनाव्हॅक या कोरोना प्रतिबंधक लशीचा वय वर्षे ३ ते १७ या गटासाठी आपत्कालीन वापर करण्याची परवानगी चीन सरकारने दिली आहे. या गटाच्या लसीकरणाची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.China planning for dose for children

जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वीच सायनोव्हॅक लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्याआधी सायनोफार्म कंपनीच्या लशीलाही मान्यता मिळाली आहे. यामुळे चीनला ही लस इतर देशांनाही पाठविता येणार आहे.देशभरात लसीकरण मोहिम राबवितानाच चीनकडून लशींची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होते आहे. चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत लशीचे ७६ कोटी ३० लाख डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.

चीनमध्ये लसीकरणासाठी पाच कंपन्यांच्या लशींचा वापर सुरु आहे. चीनने संयुक्त राष्ट्रांच्या कोव्हॅक्स सुविधा केंद्रालाही एक कोटी लस देण्याचे आश्वायसन दिले आहे.

सायनोव्हॅक कंपनीने लशीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांमध्येही ही लस प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध झाल्याचे येथील माध्यमांनी सांगितले.

China planning for dose for children

महत्त्वाच्या बातम्या