विशेष प्रतिनिधी
बीजिंग : थेट अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता चीनने मिळविल्याचा दावा अमेरिकेच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. गेल्या जुलैमध्ये चीनने हायपरसॉनिक शस्त्रांची चाचणी घेतली होती. या शस्त्रांनी पृथ्वी प्रदक्षिणा घातली होती. चीनने ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट अधिक वेगवान क्षेपणास्त्र लाँच केले होते.China could launch nuclear attack on US! China’s hypersonic missile orbited the Earth in July
त्यामुळे चीन एखाद्या दिवशी अमेरिकेवरही अणवस्त्र हल्ला करू शकतो. चीनने मात्र हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याच्या वृत्ताचा इन्कार केला असून, पुन्हा वापरात येणाऱ्या अंतराळ यानाची ही चाचणी होती, असे म्हटले आहे.
अमेरिकेच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे उपाध्यक्ष जनरल जॉन हायटेन यांनी म्हटले आहे की, चीनने २७ जुलै रोजी हायपरसॉनिक शस्त्राची चाचणी घेतली होती. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ही चाचणी होती. त्या क्षेपणास्त्राने संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. यावेळी हायपरसॉनिक ग्लाईड वाहन सोडण्यात आले होते. ते चीनमध्ये परतले.
चीनच्या या शस्त्राचा निशाणा अनेक किलोमीटरने चुकला असला तरी एखाद्या देशाच्या हायपरसॉनिक शस्त्राने प्रथमच पृथ्वी प्रदक्षिणा केली. अमेरिकेच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे उपाध्यक्ष जनरल जॉन हायटेन यांनी म्हटले आहे की, चीन एखाद्या दिवशी अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करू शकेल, एवढी त्याची क्षमता आहे.
चीनने मागील पाच वर्षांत शेकडो हायपरसॉनिक चाचण्या घेतल्या आहेत, तर अमेरिकेने केवळ ९ चाचण्या घेतल्या. चीनने मध्यम पल्ल्याचे हायपरसॉनिक शस्त्र तयार ठेवले आहे. अमेरिकेला यासाठी आणखी काही वर्षे लागू शकतात.
चीनने १८ ऑक्टोबर रोजी चाचणीला दुजोरा दिला व याला फार महत्त्व देऊ नये असे म्हटले. ही नियमित चाचणी होती व ही क्षेपणास्त्राची चाचणी नव्हे अंतराळ यान होते, असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App