विशेष प्रतिनिधी
बीजिंग – अमेरिका आणि तालिबान यांच्यात चर्चा सुरु असतानाच चीननेही तालिबानी म्होरक्यांबरोबर राजनैतिक मार्गाने संपर्क साधला आहे. तालिबानने १५ ऑगस्टला काबूलचा ताबा मिळविल्यानंतर अमेरिका आणि भारतासह अनेक देशांनी आपापले दूतावास बंद केले असले तरी पाकिस्तान, रशिया आणि चीनने दूतावास सुरुच ठेवले आहेत. China came forward to help Taliban
चीनचे अफगाणिस्तानमधील राजदूत वँग यू आणि तालिबानच्या राजकीय विभागाचा उपप्रमुख अब्दुल सलाम हनाफी यांच्यात काबूलमध्ये चर्चा झाली. अफगाणिस्तानमध्ये अफगाण लोकांचेच वर्चस्व असावे आणि त्यांच्याच नियमानुसार कारभार चालावा, या भूमिकेला चीनचा पाठिंबा आहे. त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याची आमची इच्छा आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यास आणि या देशाची पुनर्बांधणी करण्यास आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत,’’ असे चीनचे प्रवक्ते वेनबिन म्हणाले..
इतर अनेक देशांनी नागरिकांच्या सुटकेसाठी मोहिम राबविली असली तरी चीनने कोणतीही घाई केलेली नाही. तसेच, तालिबानचा प्रमुख म्होरक्या मुल्ला अब्दुल घनी बरादर याच्याबरोबर गेल्या महिन्यात त्यांनी चर्चाही केली होती.
अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांनी भूतकाळापासून काही तरी धडा घ्यावा. अफगाणिस्तानमधील समस्या सोडविण्यासाठी तालिबानवर निर्बंध टाकले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे मतही चीनने व्यक्त केले आहे.
China came forward to help Taliban
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App