विशेष प्रतिनिधी
जेरुसलेम – इस्राईल- पॅलेस्टाईनने शस्त्रसंधीला अखेर मान्यता दिली आहे. ही युद्धबंदी आजपासून अमलात येणार आहे. यामुळे या दोन देशांमध्ये गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आता थांबेल. Ceasefire between istrayel and palastine
युद्धात विजय झाल्याचा दावा इस्राईल व ‘हमास’ या दोघांनीही केला आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर गाझा पट्टा आणि वेस्ट बँकमधील हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला. या आनंदात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, अनेकांनी गाणी गायली, रस्त्यावर संचलनही केले, असे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिरडिओत दिसत आहे.
दोन्ही बाजूकडून होत असलेल्या रॉकेट व बाँब हल्ल्यात सुमारे २४० नागरिक ठार झाले आहेत. शस्त्रसंधी करून हिंसाचार थांबविण्यासाठी अमेरिका, इजिप्त आणि अन्य आंतरराष्ट्रीय मध्यस्तांकडून येत असलेला दबाव आणि शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यांत धुमसत असलेला दक्षिण इस्राईल व गाझा पट्टा यामुळे अखेर इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने काल रात्री युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला.
जेरुसलेममधील धार्मिक ठिकाणांवर प्रवेश देण्यास इस्राईल अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप पॅलेस्टिनी नागरिकांनी केला होता. अल अक्सा मशिदीमध्ये रमझानच्या दरम्यान याच मुद्द्यावरून हिंसाचार झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App