विशेष प्रतिनिधी
रिओ दी जानेरो : अमेरिकेपाठोपाठ कोरोनाची सर्वाधिक बळी संख्या ब्राझीलमध्ये असून येथे कोरोना मृतांची संख्या पाच लाखांच्या पुढे गेल्याने जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. अनेक शहरांमध्ये सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांच्या राजीनाम्याची मागणी केली.Beazil people comes on street againt Govt.
बाधितांच्या संख्येच्या बाबतीत हा देश जगात तिसरा, तर मृत्युसंख्येबाबत जगात दुसरा आहे. या दोन्ही बाबतीत क्रमांक एक वर असलेल्या अमेरिकेत संसर्ग नियंत्रणात येत असताना ब्राझीलमध्ये मात्र संख्या वाढते आहे.
देशात मृतांची संख्या पाच लाखांवर गेल्यानंतर जनतेने संताप व्यक्त करत अनेक शहरांमध्ये आंदोलन केले. देशात झालेल्या जीवितहानीला बोल्सोनारो हेच जबाबदार असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. आजच्या आंदोलनात विरोधी पक्षही सहभागी झाले होते.
ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांच्याविरोधात यापूर्वीही आंदोलन झाले आहे. मास्क न वापरणे, नियमांच्या अंमलबजावणीकडे फारसे गांभीर्यान न पाहणे अशा प्रकारच्या त्यांच्या वर्तणुकीमुळे ब्राझीलमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App