बांगलादेश मधील इस्कॉन मंदिरावर हल्ला, मंदिराच्या सदस्याचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

निओखली : दुर्गा माता उत्सवादरम्यान बांग्लादेशमधील काही हिंदू मंदिरांवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. हिंदू देवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या होत्या. त्याचप्रमाणे हिंदू भाविकांना देखील मारहाण करण्यात आली होती.Attack on iskon temple in Bangladesh , one person died

यावेळी चार लोकांना मृत्यूदेखील झाला होता. या घटनेची निंदा करत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले होते की, हल्लेखोरांवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल आणि मायनॉरिटी लोकांना सुरक्षा दिली जाईल.

त्यांच्या या विधानानंतर आणि 22 जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात केल्यानंतरही नोआखली येथील इस्कॉन मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. नोआखली येथील इस्कॉन मंदिरात 200 पेक्षा जास्त लोकांच्या जमावाने हल्ला चढवला. मंदिरातील भाविकांना मारहाण केली. मंदिराची नासाडी केली. यामध्ये इस्कॉन मंदिराचे सदस्य पार्थ दास यांची हत्या झाली आहे. त्यांचा मृतदेह मंदिरा शेजारील तलावामध्ये आढळून आला होता.

इस्कॉनने यासंबंधीची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. तेथील दृश्य ही अतिशय भयावह आहेत. हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याची आणि दोषींना न्याय देण्याची मागणी या ट्वीटमध्ये इस्कॉन मंदिराकडून करण्यात आली आहे.

Attack on iskon temple in Bangladesh , one person died

महत्त्वाच्या बातम्या